पुणे : कीटकनाशके व त्यांचे प्रमाण सर्वसामान्य माणसाला रोजच्या अन्नपदार्थात समजण्यासाठी स्वस्त व सोपी पद्धत शोधणे ही काळाची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.पूना गुजराती केळवणी मंडळ पुणे संचालित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. परिषदेच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पूना गुजराती केळवणी मंडळाचे विश्वस्त हरिभाई शाह, सचिव हेमंत मणियार, खजिनदार दिलीपभाई परमार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे उपस्थित होते. परिषदेत राज्यातील व राज्याबाहेरून १५० हून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. डॉ. प्रगती अभ्यंकर यांनी आभार मानले. परिषदेत उत्कृष्ट भित्तीपत्रके सादरीकरण करणाºया विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.प्रथम पारितोषिक : मानसी गुजर(फर्गुसन महाविद्यालय, पुणे) , द्वितीय पारितोषिक : विदुला पित्रे व अनिशा परब (फोंडा महाविद्यालय, गोवा), तृतीय पारितोषिक : नेहा प्रभू, प्रज्योत येंडे ई. हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे .
कीटकनाशके व प्रमाण समजण्यासाठी सोपी पद्धत हवी : नितीन करमळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:18 PM
पूना गुजराती केळवणी मंडळ पुणे संचालित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.
ठळक मुद्देअन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा परिषदेत राज्यातील व राज्याबाहेरून १५० हून अधिक सभासदांनी घेतला सहभाग