तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत शरद पवार म्हणाले; मागे बरेच उद्योग केले, आता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 05:48 PM2021-06-25T17:48:18+5:302021-06-25T17:52:14+5:30

दिल्ली मधील बैठक शेतकरी आंदोलनासाठी पवारांचा दावा

Need United leadership now claims NCP supremo Sharad pawar | तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत शरद पवार म्हणाले; मागे बरेच उद्योग केले, आता....

तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत शरद पवार म्हणाले; मागे बरेच उद्योग केले, आता....

googlenewsNext

मागे बरेच उद्योग केले आहेत,आता मात्र सामुदायिक नेतृत्व हवं असं म्हणत शरद पवार यांनी आपण विरोधी पक्षांचा आघाडीचं नेतृत्व आपण करूच असं काही नसल्याचं म्हणलं आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांच्याशी झालेली भेट ही शेतकरी आंदोलनाबाबत चर्चेसाठी असल्याचं म्हणलं आहे.

पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चा नव्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले "दिल्ली मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन ६ महिने सुरू आहे. ते रस्त्यावर बसलेले आहेत. या संबंधी जे संघटन आहे ते राजकीय पक्षांना बाजूला ठेवून आपली भूमिका मांडतात. त्यामुळे राजकीय पक्ष देखील दूर आहेत. मात्र आम्हाला काही लोकांना असं वाटलं की त्याला समर्थन कसं देता येईल किंवा त्यासंदर्भात केंद्र सरकारला काही सूचना करायचा असतील तर त्या कशा करता येतील, संसदेत हे कसं मांडता येईल यासाठी आपण एकत्र बसलं पाहिजे. आणि म्हणून काही संघटना आणि राजकीय पक्ष राजकीय पक्षांचा अभिनिवेश न आणता एकत्र येण्यासाठी ही बैठक होती" 

या आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार आहात का याबाबत विचारले असता पवार म्हणले ," दिल्लीतील विविध नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना आम्ही काही आघाडी म्हणून बसलो नाही.जे काही करायचे ते काँग्रेसला बरोबर घेऊन असेच माझे मत व मी ते जाहीर केले आहे.आमची नेतृत्वाची बद्दल चर्चाच नाही.सामूदायिक नेतृत्व हवे असे मला वाटते. शरद पवारांनी असे उद्योग बरेच केले आहेत. आता मार्गदर्शन सल्ला देणे हे करणार काम आहे."

Web Title: Need United leadership now claims NCP supremo Sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.