महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शतकोतर रौप्यमहोत्सव सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शशिकला वंजारी बोलत होत्या. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव पी. व्ही. एस. शास्त्री, विश्वस्त विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. काही कारणास्तव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. मात्र, त्यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश या वेळी वाचून दाखविण्यात आला.
शशिकला वंजारी यांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याची माहिती सांगत त्यांचे काम एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाता येते याबद्दल आनंद व्यक्त केला.
स्मिता घैसास यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच बाया कर्वे पुरस्काराबरोबरच अण्णांची लेक या पुरस्काराची माहिती सांगितली. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला.
कार्यक्रमात ‘ई-आचार्य’, ‘कलासरा’ महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि ‘विसावा’ कौटुंबिक अत्याचार पीडित महिलांकरिता मदत केंद्र या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे रवींद्र देव यांनी प्रास्ताविक केले. तर पी. व्ही. एस. शास्त्री यांनी आभार मानले.