पुणे : शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत गोऱ्हे यांनी पुणे शहराच्या पाणी प्रश्नासह, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा आढावा, शहर आणि जिल्ह्याचा वाहतुकीचा प्रश्न, जेजुरीगडाचा प्रश्नासह प्रमुख तीर्थक्षेत्र विकास योजना आणि रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेत पुण्याच्या ‘पालकमंत्री’ची भूमिका पार पाडली आहे. पुणे जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र महाशिव आघाडीमध्ये ठरले आहे. यामुळे पुण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला मिळणार असल्याचे मानले जाते. ‘राष्ट्रवादी’तून पक्षाचे ज्येष्ठे नेते दिलीप वळसे पाटील की अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद जाणार याची उत्सुकता आहे. परंतु सध्या तरी ही कमी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे भरून काढताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने त्या बैठका घेण्याचा झपाटा दाखवत आहेत...........मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर निर्णय होणार
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणिकाँग्रेसचे महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे दोन असे सहा आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्यापही मंत्रिपदाचे वाटप मात्र झालेले नाही. तर मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर पुणे जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार, हे स्पष्ट होईल. परंतु अजित पवार यांच्या बंडानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नक्की कुणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे. परंतु अद्याप मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच काही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊनदेखील सध्या जिल्ह्यात सध्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने फारसे लक्ष घातले नाही. ...........या उलट शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी गेल्या पंधरा दिवसांत शहर आणि जिल्ह्यातील विविध विषायांवर अधिकाºयांच्या बैठका घेतल्या आहेत. काही विषयांमध्ये अधिकाºयांना आदेश देऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्नदेखील केले आहेत. ......