पुणे : तुर्भे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती एका मुलीची छेडछाड करण्याचा घृणास्पद प्रसंगाचा व्हिडिओ आज वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून उघडकीस आला. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आरोपीने कुठलीही विचार न करता पीडित मुलीची छेडछाड केल्याचे दिसते. याबाबत शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुर्भे रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शेखर सागर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी शेखर सागर यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शेखर सागर यांना सुनावले की, आरोपीला अटक करण्यात आले आहे असे आपण स्पष्ट करायला हवे होते. जेणे करून लोकांमध्ये जागृती झाली असती आणि भीतीचे वातावरण कमी झाले असते.
भारतीय दंड संहिता ५५४, ५०९ यात आरोपीला न्यायालीयान कोठडी सुनावल्यानंतर त्याची काही दिवसातच जामीन होते न्यायालयाकडून दिली जाते असे पोलिसांचे म्हणणे असते. अशा घटनेत अटक झालेल्या आरोपींची पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करावी, जेणेकरून आरोपींनी या अगोदर असा कोणत्या घटनेत सहभाग आहे का? हे तपासण्यासून घ्यावी. तसेच सरकारी वकिलांनी न्यायालयाला हा आरोपी सुटल्यानंतर असे प्रकार करू शकतो. तक्रारदार पीडित मुलींवर हल्ला करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यासाठी पोलिसांनी सरकारी वकिलांना विनंती करावी असे ही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
रेल्वे पोलीस क्षेत्रात होणाऱ्या मुलींवरील अत्याचारबाबत दोन महिन्यापूर्वी गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत बैठक घेतली होती. यावेळी केसरकर यांनी रेल्वे पोलिसांना विविध सूचना दिल्या होता.