पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पाणीपुरवठा सोमवारी सकाळ ते बुधवारी सकाळपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केले आहे.
नीरा येथील पाणीपुरवठ्याच्या टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील गाळही काढण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी आठपासून ते बुधवारी सकाळ आठपर्यंत नीरा शहराला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी या काळात पाणी जपून वापरावे. ज्या लोकांच्या घरी बोअरवेल असेल अशा लोकांनी इतरांना सामाजिक अंतर राखून लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती राजेश काकडे यानी केली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.