शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नीरा नदीचे पात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:19 AM

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे.

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे. यामुळे या भागातील शेतातील पिके धोक्यात आली आहेत. या नदीच्या पात्रात दि.१९ मार्चपर्यंत पाणी सोडण्यात यावे. अन्यथा २० मार्चला निरवांगी येथे बीकेबीएन या रस्त्यावर निरवांगीच्या मुख्य चौकात ‘रस्ता रोको’ करण्याचा निर्णय निरवांगी येथे शेतकºयांनी बैठक घेऊन घेतला. निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी ही सर्व गावे नीरा नदीच्या पात्रालगत आहेत. या गावातील मोठ्या प्रमाणात शेतकºयांची शेती ही नीरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नदीपात्र पाण्यावाचून कोरडे पडले आहे. यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. या भागातील शेतकºयांनी शेतीच्या पिकासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु नदीच्या पात्रात पाणी नसल्याने सदर पिकांना पाणी द्यायचे कोठून, असा प्रश्न पडलेला आहे. यामुळे या नदीच्या पात्रात (दि.१९) मार्च पर्यंत पाणी सोडण्यात यावे. अन्यथा (दि. २०) मार्च ला निरवांगी या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय शेतकºयांनी निरवांगी येथे बैठकीत घेतला.या बैठकीत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होती .इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, खोरोची बोराटवाडी, पिठेवाडी, चाकाटी व परिसरातील निरा नदीच्या पात्रालगतची गावे तर माळशिरस तालुक्यातील बांगडे व पळसमंडळ व परिसरातील निरा नदीचा किनारी असलेल्या गावातील शेती ही मोठ्या प्रमाणात निरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु, सध्या नदी पात्रात पाणी नाही. नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदी पात्रात पाणी न सोडल्यास ‘रस्ता रोको’ शेतकरी करतील, असा निरवांगी येथे शेतकºयांनी बैठक घेऊन निर्णय घेतला.

टॅग्स :Puneपुणे