निरवांगी : निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे.नीरा नदीच्या पाण्यावर इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेती अवलंबून आहे. दरवर्षीही या नदीच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात पाणी उपशाचे मोटारपंप बसत आहेत. यामुळेही नदीच्या पात्रातून दरवर्षी पाणीउपशाचे प्रमाण वाढत आहे. या भागात यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने नदीच्या पात्राकिनारी असलेले ओढे, नाले पाण्याने वाहिले नाहीत. शेतात ऊस, मका, ज्वारीचे पीक उभे आहेत. पिकास नदीकिनारी असलेले शेतकरी पाणी देत आहेत. परंतु डिसेंबरमध्ये नदीच्या पात्रातील पाणी अत्यंत कमी होईल, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. यामुळे नदीच्या पात्राकिनारी असलेल्या अनेक शेतकºयांना पाण्याची समस्या निर्माण होणार आहे.कमी पाण्यामुळे निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, निमसाखर व परिसरातील शेतकºयांनी नवीन ऊसलागवड अत्यंत कमी प्रमाणात केली आहे. येथील शेतकºयांना नदीच्या पात्राकिनारी असल्याने पाटबंधारे खात्याचे पाणी मिळत नाही. या शेतकºयांना पाटबंधारे खात्याचे पाणी मागितले तर तुम्ही नदीच्या पात्राकिनारी असल्याने तुम्हाला पाणी देता येत नसल्याचे सांगितले जाते. परंतु नदीच्या पात्रात ज्यावेळी पाणी नसेल त्यावेळी मात्र कालव्याचे पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे.ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणात घटनदीकाठावरील शेतकरीच पाण्याविनापाटबंधारे खात्याकडून पाणी देण्यास नकारकालव्याचे पाणी द्यानदीकाठावरील शेती पाण्याअभावी संकटात आली आहे. त्यामुळे नदीत पाणी नसताना कालव्याचे पाणी देण्याची मागणीहोत आहे.
नीरा नदीपात्रातील पाणी होत आहे कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:58 AM