शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या नव्या विशेष रेल्वे गाड्यांमध्येही पुणे-मुंबईकडे 'कानाडोळा'; प्रवाशांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 12:07 PM

महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील

ठळक मुद्देसध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी नाही एकही रेल्वेगाडी

पुणे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरात ८० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या यादीत पुणे-मुंबई मार्गावर इंटरसिटी गाड्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे.कोरोना संकटामुळे देशातील रेल्वेगाड्या लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या. अनलॉकमध्ये दि. १ जूनपासून देशभरात २३० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्याच्या वाट्याला पुणे-दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आली. तर मुंबईतून धावणाऱ्या तीन आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या पुणेमार्गे धावत आहेत. पुण्यातून मुंबईला दररोज शेकडो प्रवासी दररोज जातात. सध्या शिवनेरी बससेवा सुरू केली असली तरी तिकीट दर परवडत नसल्याने अनेकांनी खासगी वाहनांना पसंती दिली आहे. राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठविली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे एखादी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. रेल्वे मंत्रालयाने ८० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात पुणे-मुंबईला एखादी गाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुणेकरांच्या पदरी निराशा पडली आहे.नवीन ८० विशेष गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड एक्सप्रेस, सोलापुर-म्हैसुर एक्सप्रेस आणि परभणी-हैद्राबाद एक्सप्रेस या तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही गाड्या दररोज धावणार आहेत. सध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. तसेच एसटीनेही मर्यादीत स्वरूपात बससेवा सुरू केली आहे. पण अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. या भागासाठी एकही गाडी नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेpassengerप्रवासीcentral railwayमध्य रेल्वे