शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

अब्रुनुकसानीच्या दाव्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष, न्यायालयाकडून ५०० रुपयांचा दंड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:57 AM

बोगस डॉक्टर ठरवून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून महापालिकेविरुद्ध चालविण्यात येत असलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात सातत्याने दुर्लक्ष करणे पालिकेला चांगलेच महागात पडले आहे. पालिकेविरुद्ध एकतर्फी (एक्स पार्टी आॅर्डर) आदेश का करू नयेत, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्याबरोबर या दाव्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब केला म्हणून ५०० रुपयांचा दंडही पालिकेला ठोठावण्यात आला.

पुणे : बोगस डॉक्टर ठरवून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून महापालिकेविरुद्ध चालविण्यात येत असलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात सातत्याने दुर्लक्ष करणे पालिकेला चांगलेच महागात पडले आहे. पालिकेविरुद्ध एकतर्फी (एक्स पार्टी आॅर्डर) आदेश का करू नयेत, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्याबरोबर या दाव्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब केला म्हणून ५०० रुपयांचा दंडही पालिकेला ठोठावण्यात आला.शहरातील एका बोगस डॉक्टराविरुद्धच्या खटल्यात महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका सहायक अधिकाºयाने परस्पर त्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा सी-समरी अहवाल न्यायालयात दाखल केला. त्या डॉक्टरांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी पालिकेविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा मार्च २०१७मध्ये दाखल केला आहे. त्यानंतर पालिकेने आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे मांडणे आवश्यक होते. मात्र, पालिकेकडून वेळोवेळी तारखा घेऊन त्याला विलंब करण्यात आला.प्रतिज्ञापत्र सादर करण्यास १३३ दिवसांचा विलंब लावल्याने पालिकेला ५०० रुपयांचा दंड मंगळवारी भरावा लागला. महापालिकेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध घेतलेले आक्षेप अमान्य केले आहेत. पालिकेविरुद्ध १०० कोटींचा दावा दाखल करताना संबंधित अधिकारी यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक होते, ते का केले गेले नाही?अब्रुनुकसानीच्या १०० कोटी रुपयांच्या दाव्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले तत्कालीन महापालिका आयुक्त, सहायक आरोग्य अधिकारी व विधी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी खटलाही दाखल करण्यात आला आहे. यामध्येही पालिकेच्या वतीने अजून म्हणणे मांडण्यात आलेले नाही.अपील अजूनही दाखल नाहीप्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांपुढे बोगस डॉक्टरांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर उच्च न्यायालयात आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.त्यामुळे सहायक अधिकाºयांनी परस्पर सी-समरी अहवाल दाखल केला. त्यामुळे हा खटला पुन्हा नव्याने चालविण्याची मागणी केली होती.त्या वेळी उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाºयाविरुद्ध कारवाई करावी; त्याचबरोबर या खटल्यात अपील करण्याचे निर्देश दिले होते.मात्र, मुदत उलटून गेली तरी अद्याप अपील दाखल करण्यात आलेले नाही.कागदपत्रे मिळण्यास उशीर झाल्याने विलंबल्ल महापालिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळण्यास उशीर झाल्याने याप्रकरणी पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब झाला. त्यामुळे उशीर माफीच्या अर्ज शुल्कापोटी (कॉस्ट) ५०० रुपये भरावे लागले.- मंजूषा इथापे, विधी अधिकारी, महापालिका

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेCourtन्यायालय