२०१८ मधील दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता शासनाने निधीची मान्यता दिली होती. जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईसाठी निधी मागणी कळविण्याचे आदेश तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले होते. जुन्नर तालुक्यात सहा महसूल मंडळात दुष्काळ जाहीर होऊन देखील प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी वंचित राहिल्याने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर व इतरांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. संबंधीत तक्रार अर्जासंदर्भात चौकशी अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी सारंग कोडीलकर यांनी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना दि.२ जून समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
नुकसान भरपाई अहवालाबाबत हलगर्जी, तहसीलदांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:10 AM