धनकवडी : नेपाळमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण असून त्याच उद्देशाने पंतप्रधानपदाचे उमेदवार रेशमलाल चौधरी यांनी पुण्यात नेपाळी बांधवांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.रविवारी आंबेगाव पठार येथील राधाकृष्ण गार्डन हॉलमध्ये जाणता राजा प्रतिष्ठानचे नीलेश थिटे यांनी चौधरी यांचे मावळी पगडी घालून स्वागत केले, तसेच राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या.या वेळी चौधरी म्हणाले, ‘‘भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळी लोक येतात. महाराष्ट्र, गुजरात येथे रोजगार करून आपली उपजीविका करतात. शिवाजीमहाराजांच्या विचारसरणीवर हे लोक जगत आहेत. ही शिकवण भारताकडून अनुभवली असून नेपाळला कसे विकसित करता येईल, याचा प्रयत्न करीन.’’या वेळी प्रमुख पाहुणे उद्योजक प्रदीप बेलदरे पाटील, संतोष बेलदरे पाटील, के. एम. योगी, जपटलाल सिंह, जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष चिकणे, मावळा जवान संघटनेचे सचिव उमेश आहिरे, विजय वरखडे, सागर खुटवड, शेखर खुटवड यांच्यासह नेपाळी बांधव उपस्थित होते. रूपेश महतो व दीपक कटारिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
नेपाळचे नेते चौधरी धनकवडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:26 AM