नेरे ग्रामपंचायत मागील अनेक वर्षे निवडणुका लागत होत्या. मात्र, या वेळी युवा नेते अनिल सावले यांच्या नेतृत्वाखाली गावात दत्तोबा सावले, प्रकाश मैद, शिवाजी पाटणे, शामराव चव्हाण, मिलिंद म्हसवडे, जीवनाथ पाटणे, बापू सावले, महेश उभे, संभाजी बढे, अमित मांढरे, धनंजय पवार, आनंद बढे, हनुमंत कदम यांची कमिटी करुन ९ जागांसाठी ९ उमेदवार देऊन ग्रामपंचायत तब्बल १५ वर्षांनी बिनविरोध केली आहे.
बिनविरोध सदस्य प्रभाग क्रमांक एक सोपान हरिभाऊ सावले, उज्जवला विजय बढे, लिलाबाई दत्तात्रय मांढरे, प्रभाग क्रमांक २ सुनिता मधुकर कानडे, राजेंद्र दौलती, चिकणे दिलीप विठठल पाटणे, प्रभाग क्रमांक ३ अनिता शेलार विदया हेमंत राऊत, दत्तात्रय गणपत बांदल,
नेरे ग्रामपंचायत वीसगाव खोऱ्यातील राजकीयदृष्टा अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत असून २००५ साली एकदा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. मात्र त्यानंतर १५ वर्षे निवडणुका झाल्या होत्या. यावेळी गावातील हेवेदावे मिटवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावात पंचकमिटी करुन एकत्र बसून निवडणूक बिनविरोध केल्याचे उद्योजक अनिल सावले यांनी सांगितले.
--