येरवडा : येरवडा येथील पुणे महानगरपालिका संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीत शिकत असलेल्या सुमारे चारशे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे भवितव्य अंधारात असून, सहामाही परीक्षा होऊनही येथील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. परिणामी सहामाही परीक्षेचे या दोन्ही विषयांचे परीक्षांच्या उत्तरपत्रिका कोºया करकरीत टाकून गेले आहेत.येरवडा भागातील समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने महापालिकेच्या वतीने १९५३मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय उभारण्यात आले. यापूर्वी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे ५ हजार एवढ्या प्रमाणात होती. मात्र सध्या ही पटसंख्या घसरून अवघ्या २ हजारावर आली आहे. येथे इयत्ता ५वी ते १२ वीपर्यंत शिक्षण देण्यात येत आहे. सध्या दहावीत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ८ तुकड्यांमध्ये ४०० विद्यार्थी व विद्यार्थिनींची आहे. गेल्या ६ महिन्यापासून गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. या शाळेत एकूण ३ शिक्षकांची या दोन्ही विषयासाठी गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वारंवार याबाबत शिक्षकांची मागणी करूनही संबंधित अधिकाºयांनी याकडे पाठ फिरवून शिक्षक उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले आहेत.दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. यावरच विद्यार्थ्यांचे यश-अपयशाचे भवितव्य ठरत असते. संबंधित विषयाचे शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास सर्व विद्यार्थी नापास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधित दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही विषयाचे शिक्षक मिळावेत याकरिता शिक्षण मंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार करून शिक्षक उपलब्ध करण्याची मागणी करूनही मंडळाचे पदाधिकारी याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. परिणामी गणित व विज्ञान शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला लागले आहे.- सुरेखा शिवशरण, शाळा प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयया शाळेत ४ लेखनिक असणे गरजेचे असून, मात्र त्या पैकी १ जण अंध असून दुसरा कायम तर्रर असल्याची तक्रार आहे. उर्वरित दोघे जण आवो जावो घर तुम्हारा असे समजून कधी शाळेत येतात तर कधी येत नाहीत . शिपायांची संख्या ५ असून, त्यातील बहुतांशजण काम न करता अंगावरच्या कपड्यांची घडीदेखील विसकटू देत नाहीत.विद्यालयातील माजी विद्यार्थी अरुण वाघमारे हे पालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले आहेत. त्यांच्या बरोबरीने अनेक माजी विद्यार्थी उच्चशिक्षित असून चांगल्या पदावर कार्यरत आहेत. शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अवस्था पाहून लक्ष देणे गरजेचे आहे.
नेताजी बोस शाळेतील दहावीच्या चारशे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, सहा महिन्यांपासून गणित, विज्ञानाचे शिक्षकच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 3:14 AM