ही कहाणी आहे साधना भरत खोपडे यांची. भरत खोपडे हे एका खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, कोरोना काळात सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये कंपनी तोट्यात आली आणि कामगार कपातीमध्ये भरत खोपडे यांचा नंबर लागला. त्यामुळे एका महिन्यातच उत्पन्नाची भिस्त असलेला प्रमुख मार्ग बंद फडला. भरत यांना दुसरे काम ड्रायव्हिंगचे यायचे; मात्र कोरोना काळात हा व्यवसाय पूर्ण बंद पडल्यामुळे तोही करता येत नव्हता. त्यामुळे अखेर भरत यांच्या पत्नी साधना यांनी केक बनवून विक्री करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केकसाठी लागणारा कच्चा माल विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑर्डर मिळेल तसे केक बनवून केकचा व्यवसाय सुरू केला. त्याचा वाढता प्रतिसाद पाहून सोशल मीडियाच्या माध्यमातून केकचे मार्केटिंग करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी सोशल मीडियातील जाहिरातीसाठी विविध अफलातून कल्पना लढविल्या. केवळ केक विक्री नव्हे तर केक आणि इतर पाककृतीचे व्हिडिओही त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना रेसीपीचे क्लास सुरू करता आले आणि ऑनलाईन क्सास सुरू झाले. त्यामुळे केकचा कच्चा माल, केक आणि रेसीपीचे क्लास असे उत्पन्न वाढत गेले आणि पुन्हा संसाराची गाडी रुळावर येत गेली.
--
चौकट
साधना या सध्या विविध प्रकारच्या वीस केक बनवितात. ग्राहकांना हवा तसा केक तयार करून हवी तशी डिझाईन, फोटो, नाव असे वेगवेगळ्या प्रकारे केक ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. एका केकची किंमत साधारण २५० पासून ते ४००० हजार रुपये असल्याने केकमधून उत्पन्न चांगले वाढले.
--
कोट
माझ्या मैत्रिणीकडून मी हे सर्व शिकले. दीड ते दोन वर्षांत आता २० प्रकारचे केक (बोलविक, बर्गर, सॅडविज) साधारण साडेचार हजार केके बनविले आणि विकले. या कामासाठी कामगार नाहीत, मात्र माझी मुलगी व मुलगा यांची मोठी मदत मला होते. ऑर्डरप्रमाणे रात्रीचे ३ वाजेपर्यंत केक बनविण्याचे काम सुरू असते. मात्र त्याची चव बदलू न देते यासाठी आमचा प्रयत्न असतो.
साधना खोपडे
---
फोटो क्रमांक : १४ महुडे केक स्टोरी
फोटो - केक बनवताना साधना खोपडे व मुले.