निमसाखर : इंदापूर तालुक्यात अमूल दूधच्या माध्यमातून दूधगंगा संघ चर्चा करुन दूध शीतकरण केंद्राचे जाळे निर्माण करणार आहे. सध्या काही महिन्यातच संघाने ५० कोटी रुपयांचे आत्तापर्यंत दूध संकलन केले आहे. दूधगंगावर एक रुपयांचे कर्ज नसून पुढील काळात जे काही किरकोळ देणी आहेत ती लवकरच देणार आहोत. कामगारांच्या पगाराचा देखील प्रश्न मिटला असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी माहिती दिली.
निरवांगी (ता. इंदापूर) येथील तीन तरुणांनी एकत्र येत अमूल दूध संकलन केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते फित कापून ‘अमुल दूध संकलन केंद्राचे’उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समवेत बाळासाहेब रासकर, दत्तात्रय नागरे व शहाजी होळ हे दूध संकलन करणारे उपस्थित होते. यावेळी नीरा भीमाचे माजी संचालक सुभाष पोळ, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शंकर शेंडे, माजी उपसरपंच शरद जाधव, माजी उपसरपंच दत्तात्रय पोळ, माजी सदस्य ग्रामपंचायत उत्तम पोळ, नवनाथ जाधव, पोलीस पाटील मारुती रासकर, संजय पोळ, महादेव चव्हाण उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, अमूलशी दूधगंगा संघाने करार केला आहे. शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा असुन दूध उत्पादकांना दहा दिवसाला दुधाचे बील खात्यात जमा केले जावे अशी व्यवस्था केली आहे. शिवामृत व कात्रज डेअरीकडे संचालक होतो. त्यावेळी इंदापूर तालुक्यात दूध धंद्याला प्रोत्साहन देऊन दूध उत्पादकांच्या सहकार्यातुन दूध संकलन वाढवण्याचे काम झाल्याने आज तालुक्यातुन ५ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. दुधगंगा संघ हा सहकारी संघ असुन शेतकय्रांच्या मालकीचा आहे.येत्या महिना दोन महिन्यात ५० हजार दूध संकलन तर पुढे एक लाख लिटर दूध संकलन करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. हे जे तालुक्यात ५ लाख लिटर दूध उत्पादीत होत आहे ते दूधही येत्या पुढील काळात आपल्याकडेच येईल असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मय कुलकर्णी यांनी केले.
चौकट
आमची कुठल्याही इतर दूध संघाशी स्पर्धा नसुन पारर्दकपणे दूध घ्यायचे. लहानांपासुन ते जेष्ठ, रुग्नांसह अन्य कारणांसाठी दूध लागते याची जाणीव ठेऊन दुग्ध व्यवसाय करणारा तालुक्यातील शेतकरी आहे. दूध धंद्यातील काही मंडळी दूध कलेक्शन वाढवण्यासाठी १, २ रुपया वाढवतात आणि दूध वाढले की दूध दर कमी करतात. तसे आपण नफा कमवण्यासाठी नाही तर शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन सेवा करण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.
फोटो : निरवांगी येथील दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करताना हर्षवर्धन पाटील.