पुणे : डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचारांवर येत्या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार अाहे. विद्यापीठातील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर स्टडीज सेंटरला कुलपती डाॅ. सी. विद्यासागर राव यांनी स्वतंत्र विभागाच दर्जा दिल्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करण्यात येत अाहे.
या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन पुणे विद्यापीठ अाणि डाॅ. बाबासाहेब अांबेडकर प्रशिक्षण व संशाेधन केंद्र (बार्टी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात अाला अाहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण 25 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार अाहे. यासाठीचे शैक्षणिक शुल्क अाणि विद्यावेतन बार्टीच्या वतीने देण्यात येणार अाहे. या अभ्यासक्रमांतर्गत अांबेडरांच्या विविध पैलूंवर संशाेधन करण्यात येणार अाहे. यामध्ये विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण विषयक विचार, चीन अाणि पाकिस्तान बाबतचे धाेरण, अंतर्गत सुरक्षा व परराष्ट्रीय धाेरण, भाषावार प्रांतरचना, अंतर्गत सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षेचे बदलते स्वरुप व दहशतवाद अशा विविध विषयांवर सर्वंकष चर्चा अाणि संसाेधन व्हावे यासाठी मानवविज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात अाला अाहे.
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी मांडलेल्या विचारांच्या नव्या पैलूंवर तरुणांनी संशाेधन करावे हा अागळा विचार अाहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर संशाेधनाला चालना मिळावी यासाठी पुढाकार घेत अाहे हे अाशादायी चित्र अाहे, असे मत बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी व्यक्त केले. तर डाॅ. बाबासाहेब अांबेडकर राष्ट्रीय सुरक्षा विषयक प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहतात हा अधिक सखाेल संशाेधनाचा व नाविन्यपूर्ण विषय अाहे. सामाजिक जीवनाबराेबरच राष्ट्रीय सुरक्षेचया बाबतचे डाॅ. अांबेडकरांचे विचार महत्त्वाचे अाहेत. त्याविषयती या अभ्यासक्रमांतर्गत अध्यापन, संशाेधन विद्यापीठात सुरु हाेईल, असे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर म्हणाले.
या विभागाचे प्रमुख म्हणून प्रा. डाॅ. विजय खरे यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार अाहे.