शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
2
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
3
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
4
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
5
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
6
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
7
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
8
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
9
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
10
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
11
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
12
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
14
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
15
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
16
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
17
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
19
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
20
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट

पुणेकरांसमोर नवे संकट ; टोईंगच्या नावाखाली होणार लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:57 AM

हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पुणेकरांची चौका चौकात लुट करण्याच्या प्रकारानंतर आता नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याच्या उद्देश वाहतूक पोलीस विभागाचा आहे.

ठळक मुद्देमुंबईत कंत्राट रद्द केलेल्या कंपनीला कामकंत्राट बेकायदेशीर असून रद्द करण्याची काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची मागणी

पुणे : हेल्मेटसक्तीच्या नावाखाली पुणेकरांची चौका चौकात लुट करण्याच्या प्रकारानंतर आता नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याच्या कामासाठी नागपूरच्या कंपनीला काम देऊन तिच्यामार्फत पुणेकरांची लुट सुरु केली आहे़. राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून या कंपनीचे कंत्राट बेकायदेशीर असून कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली असूनही त्याच कंपनीला पुणे शहर वाहतूक विभागाने गाड्या उचलण्याचे काम दिले असल्याचा आरोप होत आहे़. पुणे शहरातील नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याचे कंत्राट तातडीने रद्द करण्याचीही मागणी पुढे आली आहे. काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागपूर येथील विदर्भ इन्फोटेक या कंपनीला ८ एप्रिल २०१६ रोजीच्या निविदेनुसार मुंबईच्या वाहतूक पोलीस उपायुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने कंत्राट दिलेले आहे़. विदर्भ इन्फोटेक प्रा़.लि़. ही कंपनी सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि प्रोग्रॉमिगमध्ये कार्यरत असणारी कंपनी असून त्यांना टोईंगच्या कामाचा कोणताही अनुभव नसल्याने मुंबई येथील नो पार्किंगमधील वाहने टोईंग करण्याचे काम रद्द झालेले आहे़. दुचाकी वाहने टोईंग करण्याच्या निविदेनुसार २०० रुपये नो पार्किंगचा दंड व टोईंगसाठी ५० रुपये इतका दंड होता़. चारचाकीसाठी२०० रुपये दंड व टोईंगसाठी २५० रुपये इतका दंड होता़. सध्या दुचाकीसाठी ४३६ व चारचाकीसाठी ६७२ रुपये खर्च आहे़. पुणे शहरात नागपूरमधील विदर्भ इन्फोटेक कंपनीकडून दुचाकी व चारचाकी वाहने टोईंगचे काम चालू असून दैंनदिन पुणेकरांची लुट चालू आहे़. वाहने टोईंग करण्याच्या निविदेमध्ये ५ वर्षे कामाचा अनुभव नमूद असून या कंपनीला हा अनुभव नाही़. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे़.याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,  यासंबंधीची सर्व प्रक्रिया आपण वाहतूक शाखेचा चार्ज घेण्यापूर्वीच पार पडली होती़. आचारसंहिता लागू झाल्याने कंपनीशी करार करायचे काम राहिले होते़. आचारसंहिता उठल्यानंतर हा करार करण्यात आला आहे़. राज्याच्या मध्यवर्ती समितीच्या निकषानुसार हे काम देण्यात आले आहे़. या कंपनीला ५ वर्षाचा अनुभव आहे की नाही ते कागदपत्रे पाहिल्यानंतरच सांगता येईल, असे त्यांनी सांगितले़. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर