साहित्य : वर्तुळ आखण्याचे साहित्य
काय साध्य होईल ? : एकाग्रता, चापल्य
सज्जतेसाठी घोषणा : या खेळातून हसतं कोण,
या खेळातून फसतं कोण ?
खेळ खेळायचा कसा :
उपस्थित मुलांपैकी दोन मुले बाजूला काढून बाकी सर्व गोलात उभी करावीत.
गोलात उभे असताना एका आड एक गोलाच्या आत-बाहेर चेहरे करून उभे
करावेत. दोन मुले पळण्यासाठी निवडलेले असतील त्यांना दोन बाजूला उभे
करावे. शिट्टी होताच पळणाऱ्या मुलांनी गोलावरील मुलांच्या चेहऱ्याकडून
पळावयाचे आहे. पाठीकडून गेल्यास तो खेळाडू बाद व जेथे तो बाद झाला
तेथील खेळाडू पळू लागेल.
शिक्षकांनी मध्ये मध्ये अचानक गोलावरील एखाद दुसऱ्या मुलाचे तोंड
फिरवावे. पळणारी मुले अगदी मोठी माणसे सुद्धा फसतात.
सूचना: पळणारे खेळाडू चेहऱ्याकडूनच पळतील हा महत्त्वाचा नियम.
शिक्षकांनी अगदी ऐनवेळी खेळाडूचा चेहरा फिरवू नये.
--
फोटो : कॅम्पस फोल्डर - फसतं कोण