साहित्य : फक्की
काय साध्य होईल? : बचाव आणि आक्रमणाची संधी
एकाच वेळी कशी असते याचा अनुभव.
सज्जतेसाठी घोषणा : किती किती किती, छान छान छान
खेळ खेळायचा कसा? : मोठ्यात मोठा गोल किंवा चौकोन आखून घ्यावा. त्यात समोरासमोर दोन रांगा कराव्यात. दोन्ही रांगांतील पहिली मुले म्हणजे कोंबडी. या मुलाच्या पाठीमागची सर्व मुले कोंबडीची पिल्ले होय. दोन्ही कोंबड्या समोरासमोर दोन फुटांवर उभ्या करून त्या पाठीमागे सर्व पिल्ले एकमेकांच्या कमरेला धरून (आगगाडीप्रमाणे) उभे करावीत. शिट्टी होताच या कोंबडीने एकमेकांच्या गटातील शेवटच्या पिल्लास मागील बाजूने जाऊन स्पर्श करावा. जेथून साखळी तुटेल त्या पाठीमागचे बाद व कोंबडी ज्या पिलास स्पर्श करेन ती पिले बाद.
सूचना : शिट्टी होताच दोन्ही कोंबड्या पिल्लांसह प्रत्येकांच्या पाठीमागे जाऊन पिल्लांस स्पर्श करतील तसेच गोल/चौकोनाच्या बाहेर जाऊ नये.
चौकोन किंवा गोल सुरुवातीला खेळ खेळताना नसला तरी चालेल.
--
सोपान बंदावणे