पुणे - काहीच दिवसात लग्नाचा सीझन सुरू होईल. त्यामुळे जोडप्यांना आता प्री-वेडींग शूट करण्याची घाई असेल. गेल्या काही वर्षात प्री-वेडींग शूटला फार मागणी आली आहे. त्यामुळे हटके लोकेशनवर हे शूट केलं जावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्यामुळे फोटोग्राफर्सही आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम लोकेशन्सचे पर्याय सुचवत असतात. त्यातल्या त्यात बजेटमध्ये असलेलं लोकेशन प्रत्येकालाच आवडतं. हे शूट अगदी नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणीही केलं जातं. यामध्ये कस लागतो तो फोटोग्राफर्सचा. आज आम्ही तुम्हाला असेच काहीसे पुण्यातील हटके प्री-वेडींग शुटसाठीचे हटके लोकेशन्स सांगणार आहोत. इकडे जाऊन तुम्हालाही तुमच्या भावी जोडादीरासोबतचे काही क्षण फोटोमध्ये टीपायला आवडतील.
पर्वती हिल
पुण्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं पर्वती हिल याठीकाणी फोटोग्राफी उत्तम होते. सुंदर दृष्य असल्याने आपले फोटोही उत्तम येतात. शिवाय वातावरण शांत आणि आजूबाजूची हिरवळ आपल्या फोटोला अधिक खुलवत जाते.
खडकवासला
पुण्यापासून अगदी 40 मिनिटांच्या अंतरावर असलेलं खडकवासला हे सुध्दा प्री-वेडींग शूटसाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. सूर्यास्त होतानाचं इकडचा व्ह्यू पाहणे म्हणजे नयनसुखच. शिवाय नदीकाठची शांतता आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर तुमच्या फोटोला चारचाँद लावेल हे नक्की.
सारस बाग
फोटोशूट कोणत्याही बागेत उत्तमच होतं. त्यातही पुण्यातली सारसबाग प्रसिद्ध बागांपैकी आहे. त्यामुळे एखाद्या बागेत तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल तर सारसबागेचा विचार करायला काहीच हरकत नाही. 25 एकर जागेत पसरलेल्या या बागेत तुम्हाला कितीतरी नवनव्या फ्रेम्समध्ये फोटो काढायला मिळतील. पण याठिकाणी दिवसभर फार गर्दी असते. त्यामुळे सकाळी लवकर जाऊन फोटो शूट केलंत तर उत्तम होईल.
आगाखाना पॅलेस
1892 साली बांधलेल्या आगाखाना पॅलेसमध्ये इटालियन कमानी आणि भव्य पसरलेली जागा असल्याने येथे तुम्ही तुम्हाला हवी तशी फोटोग्राफी करू शकता. जर तुम्ही ग्रँड प्री-वेडींग शूटचा प्लॅन आखत असाल तर आगाखान पॅलेस योग्यच आहे. दिवसभरात तुम्ही केव्हाही येथे जाऊन शूट करू शकता.
पाताळेश्वर मंदिर
जर तुम्हाला एखाद्या जुन्या ठिकाणी, पुरातत्वाची खात्री देणाऱ्या्या एखाद्या ठिकाणी शूट करायचं असेल तर पाताळेश्वर मंदिर हा उत्तम पर्याय ठरू शकेल. आठव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात लेण्यादेखील आहेत. त्यामुळे एखादं ऐतिसाहिक प्री-वेडींग शूट तुम्ही प्लॅन करत असाल तर पाताळेश्वर मंदिराचा विचार करायला काहीच हरकत नाही.
शनिवार वाडा
अवाढव्य परिसरात पसरलेला शनिवार वाडा म्हणजे पुणेकरांची शानच. शाही पद्धतीने तुम्हाला तुमचं प्री-वेडींग शूट करायचं असेल तर येथे नक्की भेट द्या. मोठ-मोठे दरवाजे, इतिहासाची साक्ष देणारे बांधकाम यामुळे शनिवारवाडा उत्तम ठरू शकेल.
लवासा
इटालियन देशांची आठवण करून देणारं लवासा हे सुद्धा प्री-वेडींग शूटसाठी उत्तम पर्याय आहे. मुळातच या ठिकाणाला निसर्गतः रोमँटीकपणा लाभलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्री-वेडींग फोटोशूट उत्तमच होईल यात काही शंकाच नाही.