भाजपचे ॲड. संजय सावंत पाटील यांनी पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांना ३० एप्रिल रोजी वाघोलीतील न्यू मातोश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे कुठल्याही परवानगी नसताना चुकीच्या पद्धतीने चालू असून कुठलेही परवाने नसताना, कोरोना तसेच इतर रोगांवर इलाज करून मोठ्या प्रमाणात बिल आकारले जात असल्याची तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालयाचे परवाने चौकशी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन केली होती. त्या समिती च्या वतीने शहानिशा करण्यात आली. समितीच्या चौकशीनंतर त्या हॉस्पिटल चालकाला ताकीद दिल्यानंतर संबंधित हॉस्पिटल बंद करण्यात झाले आहे.
---
कोणत्याही परवानग्या नसताना चालू असलेले हॉस्पिटल आरोग्य विभागाने दक्षता घेऊन बंद करण्यास भाग पाडले. आता संबंधितांवर पुढील कायदेशीर कार्यवाही होणे अपेक्षित असून आरोग्य विभागाने निवेदन दिल्यानंतर तत्परता दाखविल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
ॲड. संजय सावंत
चौकट :-पुणे जिल्ह्यात कोरोणा रोगाने कळस गाठला असून असे बोगस हॉस्पिटल असू शकतात तरी आरोग्य विभागाने याची दखल घेऊन सर्वच हॉस्पिटलचे ऑडिट करणे गरजेचे आहे.