Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

By श्रीकिशन काळे | Updated: March 10, 2025 17:25 IST2025-03-10T17:24:06+5:302025-03-10T17:25:12+5:30

खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव देण्यात आला आहे

New metro lines will be launched for Pune residents Ajit Pawar announces proposal of Rs 9,897 crore | Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

पुणे: पुणेकरांच्यामेट्रोसाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे.

राज्याचा अकरावा अर्थसंकल्प सोमवारी (दि.१०) सादर झाला. त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या कामांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. मात्र, पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरविण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन मार्गिका होणार आहेत. पुण्यात एकूण २३ किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. सध्या दररोज दीड लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करत आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्यास या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे, पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत खडकवासला, स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप- वारजे -माणिकबाग या दोन मार्गीकांच्या 9897 कोटी रुपयांच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे.

नव्या मार्गिका सुरू होणार !

पुण्यात मेट्रोच्या काही मार्गिकांचे काम चालू आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही नव्या मेट्रो मार्गिकांचं बांधकाम सुरू करणार आहे. अनेक मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून, त्यापैकी काही मार्गिकांना मंजुरी दिली आहे. या मार्गिकांच्या कामांना आता सुरुवात होणार आहे.

पुणे मेट्रो दृष्टीक्षेपात 

मार्गांची संख्या : ०२
एकूण स्थानके : ३०
भूमिगत स्थानके : ०५
कार्यरत स्थानके : २५
नेटवर्क लांबी (किमी) : ३३.१

सध्या सुरू असलेले मार्ग 

१) वनाझ ते रामवाडी
२) स्वारगेट ते पीसीएमसी

Web Title: New metro lines will be launched for Pune residents Ajit Pawar announces proposal of Rs 9,897 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.