पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना ज्या खात्यात काम केले त्याऐवजी आम्हीच नवीन खाते घेतले असुन, त्यामधे अधिक वाढ होऊ शकते. मात्र खातेवाटपामध्ये कोणतीही नाराजी नसुन सरकार समर्थपणे चालवित जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेअजित पवार यांनी दिली . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हयामधील नेते व सदस्य यांची आढावा बैठक आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाली . या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅन्केचे अध्यक्ष रमेश थोरात , आमदार दत्ता मामा भरणे,आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, आमदार सुनिल शेळके माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे , प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सुलक्षणा सलगर ,प्रकाश म्हस्के, विजय कोलते,सतिश खोमणे, मंगलदास बांदल ,यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते . यावेळी पवार म्हणाले की सरपंच व नगराध्यक्ष पदाची निवडणुक थेट जनते मधुन होत असल्याने सदस्य व सरपंच , नगराध्यक्ष यांच्यात मतभेद होतात त्यांचा विकास कामावर परिणाम होत आहे . त्याचबरोबर प्रभाग पद्धत मध्येसुद्धा बदल करून वार्ड पद्धत होणे गरजेची आहे. मुख्यमंत्री जर जनतेमधुन नाही तर हा अट्टहास का असा सवाल करीत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विचारात घेऊन हे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यानी आता शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकत्यांसोबत दोन पावले मागे येऊन जुळवून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला . यावेळी त्यांनी निवडुन आलेल्या आमदाराचा सत्कार करत पराभव झालेल्या दोंड व खडकवासला या जागेबाबत कार्यकत्याना कानपिचक्या दिल्या .या वेळी अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, मंगलदास बांदल, सुरेश घुले , विजय कोलते यांचे भाषणे झाली . ...............पुणे जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेसला तीन मंत्री पदे मिळु शकतात असे त्यांनी सांगितले .............जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणुक नवीन वर्षात होणार असल्यांचे त्यांनी सांगत पक्षाला मतदान रुपी साथ देणाऱ्या विचार केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले .............लॅन्ड , सॅन्ड व कंपन्यांमध्ये दादागिरी करत कंत्राटे घेणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही. चुकीचे काम कोणत्याही पदाधिकाऱ्याने करू नये तसेच संस्थानमधे पारदर्शी कारभार करा, चुकीचे वागणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम अजित पवारांनी यावेळी दिला .
नवीन खाती वाट्याला आली तरी नाराजी नाही : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 7:55 PM
पारदर्शी कारभार करा चुकीचे वागणाऱ्याची गय केली जाणार नाही
ठळक मुद्देपुणे जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेसला तीन मंत्री पदे मिळु शकतात प्रभाग पद्धतमध्येसुद्धा बदल करून वार्ड पद्धत होणे गरजेचीसरकार समर्थपणे चालवित जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ,