शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भूगावमध्ये भूमाफियांचा नवा मुळशी पॅटर्न.! अस्तित्वात नसलेल्या २९ गुंठे जमिनीची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 6:33 PM

लँड डेव्हलपर, गुंड, प्रशाकीय महसूल अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पोलीस यांचा हा एकत्रितपणे चालणारा मुळशी पॅटर्न..!

ठळक मुद्देतहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक-पौड, प्रांत यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल भू-माफियांना प्रशासकीय व पोलिस यंत्रणांचे अभय; ३५ जागाधारकांची त्यामुळे फसवणूक

भूगाव : पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भूकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विना-शेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात. पण अशा कुटुंबांना फसवून लुटण्याचे प्रकार करणाऱ्या भू-माफियांचा सुळसुळाट मुळशी तालुक्यात झाला आहे. त्यांना प्रशासकीय व पोलिस यंत्रणांचे अभय लाभले आहे. तालुक्यातील प्रशासकीय व पोलिस यंत्रणा भू-माफियांची बटीक झाली आहे. लँड डेव्हलपर, गुंड, प्रशाकीय महसूल अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पोलीस यांचा हा एकत्रितपणे चालणारा मुळशी पॅटर्न!      महसूल व पोलिस यंत्रणेच्या संगनमताने श्रीशैल गाडेकर व अमित गाडेकर यांनी मौजे भुकूम (ता. मुळशी) येथील गट नं. १२४ मधील सर्व प्लॉटधारकांची फसववणूक केलेली आहे. सात-बारा उतारावर १४६ आर जागा असताना वर्ष २०१२ व २०१३ मध्ये तब्बल १७५.३ आर म्हणजे २९.३ आर या अतिरिक्त म्हणजे अस्तित्वात नसलेल्या जागेची विक्री केलेली आहे. या जागाधारकांनी शासनाला सुमारे ५० लाख रुपये महसूल भरला आहे. त्याचे सहायक निबंधकांकडे शासनाला महसूल  भरुन बेकायदेशीर दस्त झाले आहेत. भूगाव येथील तलाठी कार्यालयात देखील उशिरा व बेकायदेशीरपणे झालेल्या खरेदीपत्रांची नोंद ही त्याआधीच्या  कायदेशीर खरेदीपत्राआधी केली आहे. जोपर्यंत सर्व बेकायदेशीर व्यवहार पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत एकाही खरेदीधारकाचे नाव सात-बारा उताऱ्यावर लावले नाही. जाणूनबुजून सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लावला, तोपर्यंत सर्व बेकायदेशीर व्यवहार बिनबोभाटपणे पूर्ण केले गेले. याबाबत २०१४ ते २०१८ या कालावधीत मुळशी तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक-पौड, प्रांत यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल करूनदेखील कोणीही दखल घेतली नाही. वैतागून शेवटी त्रस्त पीडितांनी दि. २१ आॅगस्ट २०१८ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तसेच पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ताबडतोब लँड डेव्हलपर श्रीशैल गाडेकर व अमित गाडेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दिनांक २२ आॅगस्ट २०१८ रोजी डॉ. अभिजित मोरे यांच्या फिर्यादीवरून पौड पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी श्रीशैल गाडेकर व अमित गाडेकर यांच्यावर पैसे घेऊन जागा न देता परस्पर इतर व्यक्तींना विकल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय मोठा गुन्हा होऊ शकत नाही.

........................भूमाफियांना संरक्षण देणाऱ्यांच्या चौकशीची मागणी; पीडितांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने!  बेकायदेशीर खरेदीपत्र धारकांच्या ताब्यात जागा, परिणामी वारंवार वादविवाद, सतत रस्त्याची अडवणूक, जागेवर अनेकदा नामचित गुंडांचा वावर, धमकावणे, दहशत अशा छळवणूकीला सामोरे जावे लागत आहे. खरेदीला ६ वर्षे होऊन देखील अजूनही जागेचा उपभोग घेता येत नाही, अशी स्थिती झाली आहे.  ३५ जागाधारकांची त्यामुळे फसवणूक झाली आहे. .............या दरम्यान एका दुसºया तक्रारीमध्ये मुळशी तालुक्याचे तहसीलदार श्री सचिन डोंगरे, भुगाव तलाठी यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी पथकाने कारवाई केली आहे. यावरुन मुळशी तालुक्यातील महसूल यंत्रणा भ्रष्टाचारात बुडाली असल्याचे स्पष्ट होते. प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करायला जिल्हाधिकारी कार्यालय का टाळाटाळ करतेय हा प्रश्न आंदोलनकारी जागाधारक विचारत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी