पुणे : अाजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव वाढताेय. त्याचबराेबर वाढत्या प्रदुषणामुळे शुद्ध हवा अाणि पुरेसा अाॅक्सिजन मिळणे कठीण झाले अाहे. मात्र पुणेकरांना अाता शुद्ध हवा अाणि शुद्ध अाॅक्सिजन मिळणे शक्य हाेणार अाहे. पुण्यात अनाेखा अाॅक्सिजन बार सुरु झाला असून यानिमित्ताने नागरिकांना अापल्या ताण-तणावातून मुक्तता मिळवता येणे शक्य हाेणार अाहे.
नागरिकांना चांगले अाराेग्य मिळावं, शुद्ध अाॅक्सिजन घेता यावा याहेतूने तुषार खाेमने यांनी पुण्यातील लाॅ काॅलेज रस्त्याला एक हेल्थ सेंटर सुरु केले. या हेल्थ सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध अाॅक्सिजनचा पुरवठा केला जाताे. त्याचबराेबर डाेकं शांत करण्यासाठी संगीत थेरपीसुद्धा दिली जाते. दहा,वीस अाणि तीस मिनिटे अश्या सेशन्समध्ये ही थेरपी घेता येते. यात नागरिकांच्या पसंतीचे फ्लेवर्ससुद्धा अॅड केले जातात. या ठिकाणची थेरपी घेतल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. दिवसभराचा थकवा एका क्षणात दूर हाेताे. दमा असलेल्या तसेच जीम करणाऱ्यांना हि थेरपी उपयुक्त अाहे. मन प्रफुल्लीत राहण्यासाठी, एकाग्रतेसाठी अाॅक्सिजनची गरज असते. परंतु सध्याच्या प्रदुषण अाणि जीवनशैलीमुळे नागरिकांना पुरेसा शुद्ध अाॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अनेक विकारांना सामाेरे जावे लागते. यावर अाता हा अाॅक्सिजन बार एक चांगला पर्याय म्हणून समाेर येत अाहे. तुषार खाेमने म्हणाले, नागरिकांना चांगले अाराेग्य मिळावे या हेतूने हे हेल्थ सेंटर सुरु केले. नागरिकांचा चांगला प्रतिसाद याला मिळत अाहे. अाजच्या धकाधकीच्या जीवनात अापल्याला पुरेसा शुद्ध अाॅक्सिजन मिळत नाही. या अाॅक्सिजन बारमधील थेरपी घेतल्यानंतर नागरिकांना रिलॅक्स वाटते अाणि ताण-तणावातून मुक्तता मिळते. यानिमित्ताने तरुणांना राेजगाराचा एक नवीन पर्यायही समाेर अाला अाहे. शहरातील पाैड राेड व एअरपाेर्टजवळही असे हेल्थ सेंटर सुरु करण्याचा अामचा मानस अाहे.