पुणे : फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इंटरनेटने सगळ्यांच अायुष्य व्यापलं असलं तरी हे सगळं बाजूला ठेवून महिन्यातून किंवा अाठवड्यातून एकदा तरुणांचा गट एकत्र जमताे. प्रत्येकाच्या अावडीनिवडी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची एक अावड काॅमन अाहे अाणि ती म्हणजे वाचन. पुण्यात एक अागळी-वेगळी तरुणांची वाचन संस्कृती रुजत असून तरुण दर महिन्यातून किंवा अाठवड्यातून एकदा भेटून पुस्तकांचं वाचन करीत अाहेत. त्यासाठीच्या त्यांच्या जागाही तितक्याच भन्नाट अाहेत. एकत्र येऊन पुस्तकाचं वाचन करताना तयार हाेणारा माहाेल तरुणांना भुरळ पाडत अाहे. तरुण वाचत नाहीत अशी अाेरड हाेत असताना पुण्यातील तरुण याला अपवाद ठरत अाहेत. अापण वाचलं पाहिजे, त्यातून चर्चा झाली पाहिजे, विचार मंथन व्हायला हवं या उद्देशाने पुण्यात तरुणांकडून वाचनाचे विविध ग्रुप चालविले जातात. रिंगण, कानदृष्टी, वाचन अाेटा अशी विविध नावं या उपक्रमाला तरुणांनी दिली अाहेत. महिन्यातून किंवा अाठवड्यातून जसा वेळ मिळेल तसं भेटायचं एखादं पुस्तक एकाने वाचायचं अाणि बाकीच्यांनी एेकायचं. अाजच्या धकाधकीच्या अायुष्यात प्रत्येकाचं वाचन हाेत नाही. त्यातही एकाट्याने पुस्तक वाचायचं म्हंटलं की कंटाळा येताे. त्यामुळे ही वाचन अॅक्टीव्हीटी तरुणांसाठी एक पर्वणी ठरत अाहे. एखाद्याचं घर, शाळेचा हाॅल, कॅफे, बाग अश्या विविध ठिकाणी असे वाचन कट्टे भरत अाहेत. नाेव्हेंबर 2015 मध्ये नेहा महाजन व त्यांचे सहकारी अपर्णा दिक्षित, अजित देशमुख, मयूर गिऱ्हे यांनी वाचन अाेटा या नावाने वाचन अॅक्टिव्हिटी सुरु केली. सुरुवातील घरी एकत्र जमून पुस्तकाचे वाचन केले जायचे. पुढे संख्या वाढल्याने शाळांच्या हाॅलमध्ये ही अॅक्टिव्हीटी करण्यात अाली. सध्या 30- 35 विविध क्षेत्रातील लाेक दर महिन्यातून एकदा एकत्र जमून पुस्तकाचे वाचन करतात. या अॅक्टिव्हीटीचे फेसबुक पेजही त्यांनी तयार केले असून त्याच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती दिली जाते. अशीच नाटक कंपनी या नाटकाच्या संस्थेतर्फे कानदृष्टी ही अॅक्टीव्हीटी सुरु करण्यात अाली. या अॅक्टीव्हीटी बद्दल बाेलताना अनूज देशपांडे म्हणाला, अाम्ही नाटक करत असल्याने वाचन नाटकासाठी खूप महत्त्वाचे अाहे. त्यासाठी अाम्ही कानदृष्टी ही अॅक्टीव्हीटी सुरु केली. त्या माध्यमातून दर अाठवड्याला भेटून अाम्ही जुन्या लेखकांची नाटके वाचत असताे. त्यामुळे अापण ज्या क्षेत्रात काम करत अाहाेत त्याची माहिती मिळण्यास मदत हाेते.
World Book Day : पुण्यात तरुण रुजवतायेत वाचन संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 5:23 PM