पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असलेल्या प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या साईटची मंजुरी रद्द केली असल्याचे ट्विट मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले आहे. मात्र याबद्दल राज्यशासन किंवा केंद्र सरकारच्या सरंक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. शासन काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी.“पुरंदरमधील नवीन ठिकाणी प्रस्तावित पुणे विमानतळासाठीची साइट क्लिअरन्स MOD द्वारे रद्द करण्यात आली आहे, पुणे येथे नवीन विमानतळाच्या योजनेबाबत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याची विनंती??”, मेहता यांनी ट्विट केले आहे.