पुणे : महाविद्यालयीन जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला असून, त्यात ९ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे़ पीआयसीटी महाविद्यालय (अवडंबर), सिंहगड अॅकॅडमी आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज (शेवटची साक्ष), श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय (पारडं), भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय नऱ्हे (कुडाज्ञान), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (३०० मिसिंग), विश्वकर्मा इन्स्टिट्युट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (चिखलवाट), अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (घोरपडेच्या बैलाला घो़़), कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय (चित्री), मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (समीकरण) या संघांची अंतिम फेरीत निवड झाली आहे़ प्राथमिक फेरीचे परीक्षण सुबोध पंडे, सुबोध राजगुरू, मनीष वाघ यांनी केले़ अंतिम फेरीच्या एकांकिका १७ व १८ सप्टेंबर रोजी होणार आहेत़ अंतिम फेरीचे लॉटस् बुधवारी सकाळी १०.३० वाजता भरतनाट्य मंदिर येथे होणार आहेत.दर्जा खालावलेले संघ - ओळख : नेस वाडिया कॉमर्स कॉलेज, स्लॅब : सिंहगड सायन्स कॉलेज, प्रतिगांधी : मामासाहेब मोहोळ कॉलेज, इट्स एव्हरिबडीज : ए़ आय़ एस़एस़एस़एस़, बिझनेस : अभि़ महाविद्यालय, साधू! साधू! साधू! : झील कॉलेज आॅफ इंजि़, पैज : मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज, डिव्हाइन लव्ह : अहमदनगर कॉलेज, बेटर हाफ : सीओईपी, ते़़ काय़़ असतं ? : रायसोनी अभि़ कॉलेज, चाळ : सिंहगड आर्किटेक्चर कॉलेज.अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिकेकलाकारभूमिकाएकांकिकामहाविद्यालयकौस्तुभ भालेघरेहृषिकेशव्हॅलेंटाइन डेविद्या प्रतिष्ठान, बारामती.एकनाथ लिंगेवानरकाळफर्ग्युसन कॉलेज.विश्व ठक्करइम्तिआजफरहझएऩ बी़ एऩ सिंहगड इन्स्टि़सुरभि केसकरसुहास देवधरमुक्तीएमएमसीसीचे लॉ कॉलेज.एैश्वर्या वखरेमंगलागिरानआय़एल़एस विधी.पार्थ राणेसाहिलसावलीगरवारे वाणिज्य महाविद्यालय.स्वानंद पटवर्धनसलिलब्लीट्स क्रीगएम़आय़टी. इंजिनिअरिंग.अमृता ओंबळेकमलगिनिपिक्सइंदिरा कॉलेज.ऋचा कुलकर्णीतरुणीअर्धांगिनीपेमराज सारडा, नगर.नम्रता ललसेशमिकामुख्तलिफकावेरी कॉलेज आॅफ सायन्स.
पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीत नऊ संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2016 1:35 AM