पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी डिजीटल ई-चलन कार्यप्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली असून २०० उपकरणांद्वारे ५३ हजार १०७ केस करण्यात आल्या आहेत. ही कारवाई अधिक सुलभतेने करण्यासाठी अतिरिक्त ३०० इम्पॉस उपकरणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना देण्यात आली.बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंडाची रक्कम भरण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इम्पॉस हे डिजीटल उपकरण देण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियमभंगाबद्दल संबंधितांच्या मोबाईलवर त्वरित मेसेज पाठविला जातो. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाच्या वाहनाचा क्रमांक, फोटो आदी माहिती उपकरणात भरून दंडाची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे किंवा आॅनलाईन भरण्याची सुविधा करण्यात आली आहे.वाहनचालकाने पैसे भरल्यास त्याच्या मोबाईलवर त्याबाबतचा मेसेज तत्काळ पाठविण्याचीही सुविधा करण्यात आली आहे. कारवाई अधिक सुलभतेने करण्यासाठी अतिरिक्त ३०० इम्पॉस उपकरणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बुधवारी देण्यात आली. स्पार्केन आयटी सोल्युशन्सचे संचालक राजेंद्र काणे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सूत्रसंचालन केले.
कॅशलेस दंडासाठी पोलिसांचे नवे तंत्र
By admin | Published: May 26, 2017 6:19 AM