लाला अर्बन बॅंकेच्या बाजारपेठ शाखेच्या नूतन वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरपंच पाटे हे बोलत होते. नूतन वास्तूचे भूमिपूजन प. पु. आशुतोष घोष ऊर्फ मौनीबाबा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश पाटे हे होते. यावेळी वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, बॅंकेचे अध्यक्ष अॅड. निवृत्ती काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी, संचालिका मथुराताई बाणखेले, संचालक प्रल्हाद बाणखेले, मनसुखलाल भंडारी, जगदीश फुलसुंदर, अशोक गांधी, निर्मलाताई थोरात, सुनीताताई साकोरे, सचिन कांकरिया, नारायण गाढवे, डॉ. सचिन कांबळे, जैनुद्दीन मुल्ला, रामदास बाणखेले, युवराज बाणखेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, उपसरव्यवस्थापक राजेंद्र कष्टे, व्यवस्थापक सचिन गोसावी, प्रमोद कांबळे, शरद निसाळ, सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. बॅंकेचे अध्यक्ष अॅड. निवृत्ती काळे म्हणाले की, बँकेच्या मुख्य कार्यालय, डाटा सेंटर व पाच शाखा स्वमालकीच्या आहेत. सद्यस्थितीत बॅंकेच्या ३३१ कोटी ठेवी असून १७९ कोटींचे कर्ज वाटप आहे. व्यवसाय ५०० कोटी रुपये असून मागील आर्थिक वर्षात बॅंकेला २ कोटी ३१ लाख रुपये इतका नफा झालेला आहे. लवकरच मोबाल बॅंकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच नवीन शाखांचा विस्तार करण्याचा मनोदय काळे यांनी व्यक्त केला.
स्वागत संचालक अशोक गांधी केले तर उपाध्यक्ष नितीन लोणारी यांनी आभार मानले.
लाला बॅंकेच्या नारायणगाव येथील बाजारपेठ शाखेच्या नूतन वास्तूच्या भुमिपूजन प. पू. मौनीबाबा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सरपंच योगेश पाटे, बॅंकेचे अध्यक्ष अॅड.निवृत्ती काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी, संचालिका मथुराताई बाणखेले, संचालक प्रल्हाद बाणखेले अशोक गांधी, सर्व संचालक उपस्थित होते.