पुणे : नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सर्व नवीन माल व प्रवासी वाहनांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या तपासणीनंतरच संबंधित वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे आरटीओवरील कामाचा ताणही वाढला होता. मनुष्यबळाअभावी तपासणी विलंब होत असल्याने नवीन वाहने मार्गावर येण्यासाठी खूप दिवस लागत होते. त्यामुळे ही वाहने अनेक दिवस जागेवर उभी करावी लागत होती. वाहतूकदारांनी केलेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने दि. २ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांपर्यंत वाहनांना योग्यता प्रमाणपत्रातून सूट देण्याची अधिसूचना काढली; पण दोन महिने होत आले, तरी परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.नोंदणी दिनांकापासून २ वर्षांपेक्षा जास्त, परंतु ८ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील वाहनांनाही दोन वर्षे कमी कालावधीतील वाहनांना दर दोन वर्षांनी, तर त्यानंतर दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असेल.‘आरटीओ’ला दिलासापुणे आरटीओमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. परिवहन विभागाच्या निर्णयामुळे आता नवीन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे इतर कामांचा वेग वाढणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी याबाबत आदेश काढूनही राज्य सरकारने आता आदेश काढला आहे. या कालावधीत घेतलेले शुल्क सरकार परत करणार का? आजही सॉफ्टवेअर राज्यातील आरटीओ कार्यालयात अद्ययावत नाहीत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नोंद झालेल्या वाहनांना या योजनेचा फायदा झालेला नाही.- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चालक-मालक वाहतूक संघटना
नवी वाहने दोन वर्षे धावू शकणार, योग्यता प्रमाणपत्राची नाही गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 2:14 AM