पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नवीन मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. याअंतर्गत यापूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांसह सर्वांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांनाच प्रत्यक्ष मतदान करता येणार आहे. जुन्या मतदार याद्या रद्द समजण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू झाली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. सध्याची सदस्यांची मुदत जुलै २०२० मध्ये संपुष्टात येते. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानुसार यावर्षीपासून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. तसेच नवीन मतदारांनाही या प्रक्रियेत नोंदणी करता येईल. जुन्या याद्या रद्द होणार असल्याने या यादीतील मतदारांना मतदान करता येणार नाही. मतदार नोंदणी ६ नोव्हेंबरपर्यंतच करता येईल. त्यानंंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. सध्या विधानसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. याच कालावधीत मतदारयाद्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभागामार्फत जनजागृती केली जाणार आहे. तसेच विविध पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता घेतली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकाºयांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच तहसील कार्यालय व उपजिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विभागीय आयुक्त हे विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी असतील. तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.............पदवीधर मतदारसंघासाठी नमुना १८ तर शिक्षक मतदारसंघासाठी नमुना १९ हा मतदार नोंदणी अर्ज भरावा लागेल. अर्जाच्या छापील प्रती मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी इतर अधिकारी यांच्या कार्यालयात मिळतील. तसेच हस्तलिखित, टंकलिखित किंवा खासगी रीतीने छापलेले नमुनेही स्वीकारणार आहेत. संबंधित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकाºयांकडे व्यक्तिश: किंवा टपालाने जमा करता येईल. एकत्रित स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ कुटूंबातील सदस्यच असे अर्ज जमा करू शकतात.पदवीधर साठीची पात्रता संबंधित व्यक्ती दि. १ नोव्हेंबर २०१९ पुर्वी किमान ३ वर्षे भारतातील कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असले किंवा त्याच्याशी समकक्ष अर्हता धारण करीत असेल तर पात्र ठरेल. तीन वषार्चा कालावधी हा पदवी परीक्षेच्या निकालाच्यातारखेपासून ग्राह्य धरला जाईल.------------शिक्षकसाठी पात्रतासंबंधित व्यक्त दि. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वीच्या सहा वर्षामध्ये कोणतीही तीन वर्षे कालावधीसाठी माध्यमिक शाळेच्या दजार्पेक्षा कमी दजार्ची नसलेल्या राज्यातील कोणत्याही संस्थेमध्ये अध्यापन केलेले असावे. -----------मतदार नोंदणीची प्रक्रिया- दि. १ ऑक्टोबर - मतदार नोंदणी सुचना प्रसिध्द- दि. ६ नोव्हेंबर - मतदार नोंदणी अर्जावरील दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत- दि. १९ नोव्हेंबर - हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. २३ नोव्हेंबर - प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी- दि. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर - दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- दि. २६ डिसेंबर - दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दि. ३० डिसेंबर - मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची नव्याने मतदार नोंदणी : डॉ. दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:24 PM
मतदार नोंदणीची प्रक्रिया ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार..
ठळक मुद्देमतदार नोंदणी प्रक्रिया सुरूप्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जाणार