शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पुण्यातील पीएमपीचा उत्पन्न मिळवण्यासाठीचा नवा मार्ग, बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 5:05 PM

सेवेसाठी पीएमपी जवळ असणाऱ्या २२०० बसेसचा वापर

ठळक मुद्देसेवेसाठी एका एजन्सीची नियुक्ती होणार, चालक, वाहक यांना या बाबत प्रशिक्षणही दिले जाणार

पुणे: पुण्यातील पीएमपी बसने उत्पन्न मिळ्वण्यासाठी नव्या मार्गाचा अवलंब केला आहे. आता बसमधून कुरिअर आणि मालवाहतूक सेवा सुरु होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत ही सेवा सुरु झाल्याने मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पीएमपीची आर्थिक तडजोड कमी होणार आहे.  

पीएमपी जवळ असणाऱ्या २२०० बसेसचा वापर या सेवेसाठी होईल. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची १३ आगार आहेत. तसेच प्रमुख ४० बस स्थानके आहेत. त्या ठिकाणी बसमधून करिअर किंवा मालवाहतूक करता येईल, अशी संकल्पना असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. सेवेसाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. तिच्या माध्यमातून कुरिअर किंवा मालवाहतूक दिलेल्या पत्त्यावर करण्यात येईल. तसेच काही आगारांतून दुसऱ्या आगारांत कुरिअर अथवा माल पोचल्यावर नागरिकांना तेथूनही तो घेता येऊ शकेल. नागरिकांना वस्तू घरपोच हव्या असतील. तर संबंधित एजन्सीच्या माध्यमातून त्या पोहोचवण्यात येतील. कुरिअर किंवा मालवाहतूक कंपन्यांच्या तुलनेत पीएमपीचे दर किफायतशीर असतील, असेही त्यांनी सांगितले.

एजन्सीला १३ आगारांत आणि प्रमुख स्थानकांवर सहकार्य करण्याची पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. तसेच चालक, वाहक यांना या बाबत प्रशिक्षणही दिले जाईल. असे पीएमपीच्या बसमध्ये काही बदल होणार आहेत. पीएमपीच्या कार्यशाळा चालू असताना ते बदल होऊ शकतील. पीएमपीच्या संचालक मंडळानेही या सेवेला मंजुरी दिली असल्याने आता एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया अल्पावधीत सुरू करण्यात येईल. असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका