बिबवेवाडी : भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे.प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांनी या विषयी सांगितले, की आजची युवा पिढी चुकीच्या विचाराने व व्यसनाने भरकटत चालली आहे. त्यांना यापासून थांबवायचे असेल तर भगवान महावीरांचा अनेकांतवादाचा सिद्धांत अवलंबणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण सांगतो ते देखील बरोबर आहे व ते सांगतात ते देखील कदाचित बरोबर असेल. त्यामुळे युवा पिढीला पाहिजे असलेले गाणे-डीजे देखील येथे लावण्यात येणार आहेत. खाण्याचे स्टॉल्सदेखील या ठिकाणी असणार आहेत. तसेच वन मिनिट गेम, ड्रेस स्पर्धा, गिफ्ट वाटप देखील या ठिकाणी होणार आहे. त्या सोबतच महामंगलीक, स्त्रोत पठण, प्रबोधन होणार आहे. त्यामुळे धार्मिक व आधुनिक पद्धतीने येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत या ठिकाणी होणार आहे. सकल जैन समाजातील सर्व युवक-युवती या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत.
धार्मिक-आधुनिक पद्धतीने पुण्यात होणार नववर्षाचे स्वागत; मधुस्मिताजी म. सा. यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:12 PM
भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे.
ठळक मुद्देमहावीर प्रतिष्ठान येथे होणार नवीन वर्षाचे स्वागतआजची युवा पिढी चुकीच्या विचाराने व व्यसनाने भरकटत चालली आहे : मधुस्मिताजी म. सा.