कोये (ता. खेड) येथे रात्री ३ ते ४ च्या सुमारास कोणीतरी स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून दिले. अर्भकाच्या रडण्याचा आवाज येथील उषाबाई हिरामण राळे यांना आला. त्यांनी पोलीस पाटील साहेबराव राळे यांना ही बाब कळविली. यानंतर पोलीस पाटील राळे व ग्रामस्थ मानद राळे, उपसरपंच सागर राळे, गोविंद राळे, पोपट राळे यांनी हे अर्भक पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नवजात अर्भकाच्या जन्म चार तासांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आरोग्य अधिकारी अश्विनी कांबळे यांनी वर्तविला. याबाबत पोलीस पाटील साहेबराव राळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
फोटो : कोये येथे सापडलेलेल्या नवजात अर्भकासोबत ग्रामस्थ व आरोग्य अधिकारी कांबळे.