पुणे: भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या सरचिटणीसपदी गोवर्धन फाऊंडेशनचे सुनील मिश्रा यांची निवड केली आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विविध उपक्रम
पुणे: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिंहगर्जना प्रतिष्ठान आणि शिवसेना सिटी पोस्ट शाखेच्या वतीने रेड लाईट भागातील महिलांसाठी विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये महिलांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळवून देण्याबरोबरच, नवीन आधार कार्ड काढणे आणि दुरुस्ती, पोस्ट बँक खाते, असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या वेळी शिवसेना पुणे शहर संघटक राजेंद्र शिंदे, शहरप्रमुख संजय मोरे, आदींनी सहभाग घेतला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
पुणे: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादीच्या कार्यालयात अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी रितिक सवाणे, महेंद्र कांबळे, शुभम माने, आकाश वाघ आदी उपस्थित होते.
सरचिटणीसपदी दिनेश नायकू
पुणे: भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पुणे शहराच्या सरचिटणीसपदी वीर शैव लिंगायत गवळी समाजाचे पुणे शहर अध्यक्ष दिनेश नायकू यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी ओबीसी महामोर्चा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक धीरज घाटे आदी उपस्थित होते.
स्वाती चिणे यांना पीएचडी जाहीर
पुणे: स्वाती चिणे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे. त्यांनी मानवविज्ञान शाखेअंतर्गत विधी विषयात शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील विधी विभागप्रमुख डॉ. हेमा मेनन यांनी मार्गदर्शन केले.