शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

NIA Raids In Pune: एनआयए कडून इसीसशी संबंधाच्या संशयावरुन वानवडीत छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 2:25 PM

दहशतवादी संघटना ‘इसीस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोंढव्यात एका घरात छापा मारला

पुणे : दहशतवादी संघटना ‘इसीस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोंढव्यात एका घरात छापा मारला. याप्रकरणात एकाची चौकशी करण्यात आली तसेच काही कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू असे साहित्य जप्त करण्यात आले. वानवडीत परिसरात तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे. इसीसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. 

खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्रॅ्ानिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. ‘इसीस’शी संबंध असल्याच्या संशय तसेच देशभरात घातपाती कारवायाच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतून जैनब सामी वाणी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. जामीयानगर, दिल्ली) या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली हाेती.  हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. त्यांच्या चौकशीत चौघा जणांची नावे निष्पन्न झाली होती.त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अब्दुला बासीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीक खत्री, अब्दुर रहमान उर्फ डाॅ. ब्रेव्ह यांना अटक केली होती. 

आतापर्यंत याप्रकरणात सहा जणांविरोधात एनआयएने न्यायालायत दोषाराेपपत्र दाखल केले आहे. इसिससाठी काम करणार्‍यासाठी सेल स्थापन करुन त्याद्वारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे हे काम या गटाचे होते. शस्त्रे गोळा करण्यासाठी निधी उभारण्यासाठी आणि हत्या घडवून आणण्याचे त्यांचे उद्दीष्ट असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात येत असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एनआयचे पथक पुण्यात तपास करत आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार तल्हा खान याचा ‘इसीस’शी संबंध असल्याचा संशय असल्याने एनआयएच्या पथकाने त्याच्या कोंढव्यातील घरात छापा टाकून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॅानिक्स वस्तू जप्त केल्या. याप्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’कडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसISISइसिस