पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीतील दुर्मिळ चित्रपटांचा ठेवा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) जागेअभावी चित्रपटांच्या संकलनास मर्यादा येत आहेत. मात्र आता चित्रपट संकलनासाठीची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने एनएफएआयने पावले उचलली असून, फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट््यूट आॅफ इंडियाने (एफटीआयआय) कोथरूडमधील आपली ३ एकर जागा एनएफएआयला उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या हस्तांतरणासंदर्भात या दोन सरकारी संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
सध्या एनएफएआयमध्ये २७ व्हॉल्ट इतकी चित्रपट संकलनासाठीची क्षमता आहे. २००८ मध्ये या जागेची उभारणी करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांत २६ हजार चित्रपट जतन करण्यात आले असून, त्यामध्ये निगेटिव्ह, सॉँग्स निगेटिव्ह, नायटेÑट, कृष्णधवल आणि कलर चित्रपटांच्या रिळांचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत सेल्युलाईड चित्रपट जतनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्मात्यांनाही चित्रपट रिळे जतन करण्याचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे चित्रपट, लघुपट, माहितीपटाचे संवर्धन होण्यासाठी संग्रहालयाकडे पावले वळू लागली आहेत. परंतु आता एनएफएआयची चित्रपट संकलित करण्यासाठीची क्षमता पूर्णपणे संपली आहे. त्यासाठी नवीन जागेची उभारणी करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. ही गरज लक्षात घेऊन एफटीआयआयकडून त्यांची ३ एकर जागा उपलब्ध झाली असून, ती जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात सामंजस्य करार झाला असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.चित्रपट संकलनाच्या क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञान कोणते आले आहे, त्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी चर्चा करून ही नवीन जागा विकसित केली जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.- प्रकाश मगदूम,संचालक एनएफएआयभारतीय चित्रपरंपरेचे जतन करण्याची फार मोठी कामगिरी एनएफएआय पार पाडत आहे. हे योगदान कधीही न संपणारे असेच आहे. या संस्थेची ही प्रचंड मेहनत पाहूनच त्यांना ही जागा आॅफर केली आहे.- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय