पुणे : गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने लष्कर परिसरातील अरोरा टॉवर हॉटेलजवळ सापळा रचून दोन नायजेरियन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८४ हजारांचे कोकेन जप्त केले आहे.उचेचिकुवा चिजोके (वय ३०, रा. शालीमार सोसायटी, कोंढवा) आणि जॉन एकेन मेडेके (वय ३४, रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही मूळचे नायजेरीयाचे राहणारे आहेत.हे दोघेही कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे शैलेश जगताप यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने सापळा रचला. बनावट ग्राहकामार्फत त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अरोरा टॉवर जवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये २३ ग्रॅम कोकेन मिळून आले.आरोपींकडे चौकशी केली असता त्यांचा व्हिसा संपल्याचे समोर आले. मेडेक हा मुंबईमध्ये राहण्यास असून तो चिजोकेच्या मदतीने पुण्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आला होता. येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाचे शैलेश जगताप यांना मिळाली. (प्रतिनिधी)
कोकेन विक्रीप्रकरणी नायजेरियन अटकेत
By admin | Published: January 05, 2017 3:06 AM