पुणे : अयाेध्येत राम मंदिर लवकरात लवकर बांधावे या मागणीसाठी राज्यातील शिवसैनिक अयाेध्येत दाखल झाले अाहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अाणि संपूर्ण ठाकरे परिवार अाज अयाेध्या दाैऱ्यावर अाहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरात शिवसेनेचे कार्यकर्ते राम मंदिरात अारती करत अाहेत. पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिरात अामदार नीलम गाेऱ्हे यांनी अारती केली. तसेच श्रीराम लिहिलेल्या पेढ्यांचा प्रसादही दाखवला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
यावेळी बाेलताना गाेऱ्हे म्हणाल्या, काही लाेक विचारतात की इतर प्रश्न असताना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा का उचलून धरताय, त्यांच्यासाठी मला सांगायचंय की वचनपूर्ती नावाची गाेष्ट असते. 1992 च्या पूर्वीपासून राम मंदिरासाठीचा लढा सुरु अाहे. या मंदिरासाठी दाेन पिढ्यांनी मेहनत केली अाहे. केंद्रात अाणि राज्यात सरकार अालं पण मंदिराचा मुद्दा अद्याप अपुरा राहिला अाहे. म्हणून ताे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा अशी अामची मागणी अाहे.
दरम्यान उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबीय अयाेध्येत दाखल झाले अाहे. भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्याचे स्वागत करण्यात अाले अाहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयाेध्येत कडेकाेड बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे.
Ram Mandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव