निलेश राणे तुम्ही एकदा बारामतीला या! अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 21, 2020 04:52 PM2020-12-21T16:52:30+5:302020-12-21T17:03:16+5:30

राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांना बारामती भेटीचे 'ठरवून' आमंत्रण

Nilesh Rane, come to Baramati once! Reply to Ajit Pawar's criticism directly from Baramati | निलेश राणे तुम्ही एकदा बारामतीला या! अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर 

निलेश राणे तुम्ही एकदा बारामतीला या! अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर 

Next

पुणे : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून राणे पिता-पुत्र हे महाविकास आघाडीतील शिवसेनेसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर निशाणा साधत आहे. विविध मुद्यांवरून आघाडीतील नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंब सोडत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते व माजी खासदार असलेले निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला थेट बारामतीतून प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांना बारामती भेटीचे 'ठरवून' आमंत्रण दिले आहे.  

भाजपनेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी शब्दात टीका केली होती. ते म्हणाले होते, अजित पवार यांना आज जो काही मान आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांच्यामुळेच आहे. बारामतीत आजदेखील शरद पवार यांचीच पूर्णपणे ताकद असल्याचे दिसते. तसे अजित पवारांचे काहीही ताकद बारामतीत नाही. ते स्वबळावर ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाही. 

बारामती शहर युवक काँग्रेसने निलेश राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देतानाच अजित पवारांनी केलेली विकासकामे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य पाहायला बारामतीत जरूर या असे थेट आव्हानच दिले आहे. या आमंत्रणाला राणे नेमके काय प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

बारामतीत शरद पवार यांनी पूर्णपणे स्वतःची वेगळी ओळख व ताकद निर्माण केली आहे.बारामतीतील बारीक सारीक गोष्टींची देखील ते तपशीलवार माहिती ठेवतात. बर्मातीवर त्यांची करडी नजर असते. आजदेखील त्यांनी आपली ताकद जराही कमी होऊ दिलेली नाही.तसे अजित पवारांच्या बाबतीत म्हणता येणार नाही. बारामतीत त्यांची स्वतःची अशी काहीही ताकद नाही. या शब्दात निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. 

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर मासाळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मोदी व तुमचे भाऊ नितेश राणे यांनी देखील वारंवार बारामतीच्या विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले आहे. आधी बारामतीतील विकास कामांची त्यांच्याकडून माहिती घ्या आणि नंतर बरळत चला अशा खरमरीत शब्दांत हल्लाबोल केला आहे. 

अजित पवारांनी मोठमोठ्या बाता करु नये....
अजित पवार यांनी बारामतीत काहीही केलेले नाही. तसेच त्यांच्या स्वतःच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. ते स्वबळावर ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निवडून आणू शकत नाही. म्हणून मी निवडून आणतो असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. ते कुणाच्या विजयाचे श्रेय घेऊ शकत नाही. तसेच निष्कारण अजित पवारांनी मोठमोठ्या बाता करु नये.

Web Title: Nilesh Rane, come to Baramati once! Reply to Ajit Pawar's criticism directly from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.