निमगाव केतकी: वाढता उन्हाळा त्यातच ग्रामीण रुग्णालयाच्या विंधनविहिरीवरील विद्युतपंप जळाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून रुग्णालयासह वसाहतीमधील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीत आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून समाजहिताचे काम करत आहे. पण, त्यांनाच त्यांचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी साधे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने नक्की सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था काय करत आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी पुरेसे मिळत नसल्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे निवासी कर्मचारी सिस्टर यांनी सांगितले. ही पाणी गैरसोय पाहून जन प्रहार संघटने तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी पाणी टँकर पुरवून गैरसोय दूर केली. या वेळी प्रथम निमगाव केतकीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप यांना भ्रमणदूरध्वनीवरून आरोग्य कर्मचारी वसाहत व ग्रामीण रुग्णालयातील पाण्याच्या गैरसोईबाबत विचारणा केली,त्यावर ते आमच्याकडे नसून ग्रामीण रुग्णालय बघेल असे त्यांनी उत्तर दिले. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा संपर्क होऊ शकला नाही.
पाणीपुरवठा सोयीबाबत प्रहार संघटनेने डॉ. एकनाथ चंदनशिवे व डॉ. मिलिंद खाडे यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांचेकडे तक्रार केली.त्याची दखल घेत सरपंच व ग्रामसेवक यांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणी टँकरने द्या, अशी सूचना तहसीलदार ठोंबरे यांनी दिल्या. ते मान्य करत सरपंच डोंगरे यांनी ग्रामसेवक जगताप यांना सूचना पाणीपुरवठा करण्यास सांगितले. या वेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत, अॅड. सचिन राऊत, गणेश घाडगे, बेबा डोंगरे आदी उपस्थित होते.
निमगाव केतकी येथे आरोग्य कर्मचारी वसाहत व रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना प्रहारचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचारी.
०८०५२०२१ बारामती—०१