बुधवार (दि.२ जून) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती देताना चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत म्हणाले की, बतमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर एका पिकअप टेम्पो क्रमांक ( एमएच१४ जेएल १४६८) मध्ये ३३,८८० रुपयांचा सुगंधी गुटखा व पिकअप असा ६ लाख ३३,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रकाश गोविंदजी नगदा (वय ४८ वर्षे,रा.ग्रीन इस्टेट,चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी फाटा येथे इको क्रमांक (एमएच १४ एफएम ९७६४) गाडीत बसून अवैध मटका खेळला जात असल्याने चाकण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गोविंद हनुमंत उपाडे (वय ३६,रा. मोशी, ता. हवेली), अनिल स्वराज गोदाल (वय ३१, रा. कुरुळी) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मटका खेळायला लागणारे साहित्य व १०,३०० रुपये रोख आणि इको गाडीसह ३,२४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम गायकवाड,अनिल देवडे, संदीप सोनवणे,मच्छिंद्र भांबुरे,सोमनाथ झेंडे,सुरेश हिंगे,जयदीप सोनवणे,रेणुका माने, देवयानी सोनवणे,नितीन गुंजाळ,प्रेमकुमार पावडे आदींनी कारवाई केली.
--------------------------------------------------------