आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावे हाय अॅलर्ट शासनाने घोषित केली आहेत. या गावांमध्ये नागरिक शासनाने घोषित केलेले नियम पाळत नसल्याच्या अनेक तक्रारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांच्यापर्यंत गेल्या होत्या. मंगळवारी संध्याकाळी अचानक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, धामणी या गावांना भेट देऊन पाहणी केली. गावात विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. जारकरवाडी येथे नऊ जणांवर कारवाई करत चार हजार रुपये दंड वसूल केला. तर अवसरी बुद्रुक येथे दहा जणांवर कारवाई करत पाच हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे, पोलीस नाईक राजेश नलावडे, पोलीस नाईक तान्हाजी हगवणे, पोलीस नाईक नीलेश खैरे यांनी ही कारवाई केली आहे.
नियमभंगप्रकरणी साडेनऊ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:10 AM