निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाई दर्शन, हडपसर, पुणे ), बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी अधिकी माहीत अशी की, रविवारी (१८ जुलै ) रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे ( वय रा. जावजीबुवाची वाडी ता.दौंड ) त्यांच्या त्यांचे हॉटेलमध्ये जात असताना एक सतरा वर्षीय मुलगा अल्पवयीन मुलगा व निलेश आरते यादोघांनी दुचाकीवरून ((एमएच १२ पीव्ही ५१९४) येऊन त्यातील अल्पवयीन मुलाने आखाडे यांचे डोके, हात व पायावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. उपचार सुरु असतािना त्यांचा मृत्यू झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली १० जणांना अटक करण्यात आली. त्यांना आज शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले. आरोपींनी गुन्हा करत असताना घातलेली कपडे जप्त करावयाची आहेत. हत्त्याचा कट कसा व कोठे केला याचा तपास करावयाचा आहे, हत्यार जप्त करावयाचे आहे तसेच गुन्ह्यात यांचेसमवेत आणखी कोण सहभागी आहेत काय? याचा शोध घ्यायचा आहे असा युक्तीवाद करत आरोपींना पोलिस कोठडी मागितली होत. ती मान्य करत प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांनी ९ जणांना गुरुवार (२९ जुलै ) पर्यंत पोलीस कोठडीत तर १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे) हे करीत आहेत.