शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

‘पुरुषोत्तम‌’च्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:27 PM

स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती.

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड करण्यात आली असून अंतिम फेरी दि. 21 व 22 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या कालावधीत 51 संघांचे सादरीकरण झाले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघांची आज (दि. 30) निवड करण्यात आली. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. 

स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. 21 सायंकाळी 5 ते 8 आणि तर रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

अंतिम फेरीसाठी निवडलेले संघ (महाविद्यालयाचे नाव आणि एकांकिका या क्रमाने)बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (बिजागरी)म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज (तेंडुलकर्स्‌)स. प. महाविद्यालय, पुणे (पार्टनर)आय. एम. सी. सी. (सखा)न्यू आर्टस्‌‍ कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर (देखावा)विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी)गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. 1532)डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (तृष्णाचक्र)फर्ग्युसन महाविद्याल (11,111)

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) या क्रमाने 

वैभव वासणकर (आबा/वासुदेव, भ्रीडी, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी बी. स्कूल)मिहिर माईणकर (जीवन साठे, जीवनसाठे अंडरग्राऊंड, सी. ओ. ई. पी. तंत्रज्ञान विद्यापीठ)शर्वायु ढेमसे (आबा, निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)वेदिका वाबळे (रत्ना, समुद्र बिलोरी ऐना, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड कॉम्प्यूटर स्टडिज)ऋतिक रास्ते (सुरज बनकर, फिर्याद, टी. जे. कॉलेज कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय)रुपाली सोनवले (रूपा, थँक यू..!, अण्णासाहेब मगर महाविद्यालय)राजसी वळामे (नेत्रा, स्कीम, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)केदार लगस (मास्तर, शाळा तपासणी, एन. बी. एम. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट)सोहम देशपांडे (पात्र, अरे आवाज कोणाचा..?, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)अविष्कार ठाकूर (आनंद, अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शकऋतुराज दंडवते (अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)उष्ोजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिकावैष्णवी जमदाडे (निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)

दर्जा खालावलेले संघ (एकांकिका, महाविद्यालय क्रमाने)

आता वाजव (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)तो का आपण (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय)चालुनी जावे (नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय)मेघ गगनाविना बरसले (पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)विमोचन (पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय,शिवाजीनगर)स्कीम काय? (मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय)फर एव्हर अलोन (ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे)जिना (नौरोसजी वाडिया महाविद्यालय)सत्त्याण्णव पावसाळे आणि मुसळधार पाऊस (विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब, वालचंदनगर)अल्ट-कंट्रोल-डिव्हिजन (सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग)