कोरोना रूग्ण सहायता केंद्रात शंभरातले नव्व्याण्णव फोन रेमडेसिविर आणि बेडचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 05:29 PM2021-04-27T17:29:32+5:302021-04-27T17:36:52+5:30

दिवसभरात शंभर पेक्षा जास्त फोन, काँग्रेसच्या केंद्राचा अनूभव

Ninety out of 100 phones at Corona Patient Support Center | कोरोना रूग्ण सहायता केंद्रात शंभरातले नव्व्याण्णव फोन रेमडेसिविर आणि बेडचेच

कोरोना रूग्ण सहायता केंद्रात शंभरातले नव्व्याण्णव फोन रेमडेसिविर आणि बेडचेच

Next
ठळक मुद्देमहापालिकेने बेड मिळण्याबाबत शहरात एकाच ठिकाणी माहितीची व्यवस्था करावी

पुणे: प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जिल्हा काँग्रेस भवनमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना रूग्ण सहायता केंद्रात दिवसभरात १०० पेक्षा जास्त फोन येतात. त्यातले बहुसंख्य फोन एकतर रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या किंवा मग बेड, ऑक्सिजन बेड मिळवून द्या असेच असतात. असे फोन कॉल घेणाऱ्यांनी सांगितले.

सकाळी ९ ते रात्री ऊशीरापर्यत काँग्रेस भवनच्या एका कक्षात हे केंद्र सुरू असते. विद्यार्थी काँग्रेस (एन एसयूआय) व युवक काँग्रेस (यूथ काँग्रेस) चे भूषण रानभरे, विशाल मलके, अविनाश सोळुंके, सौरभ अमराळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते तिथे असतात. शहर सरचिटणीस रमेश अय्यर, सचिन आडेकर केंद्राचे समन्वयक आहेत. अय्यर यांनी फोन कॉल घेणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पालिकेतील गटनेते आबा बागूल तसेच अन्य नगरसेवक प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड यांच्या माध्यमातून फोन करणाऱ्यांच्या अडचणीवर मार्ग काढण्यात येतो. त्यासाठी फोन कॉन्फरन्स, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना फोन केले जातात.

बेड मिळण्याच्या बाबतीत महापालिकेने किमान एकाच ठिकाणी सर्व शहराची माहिती मिळावी याची व्यवस्था करावी.  तंत्रज्ञानाच्या साह्याने हे अगदी सहज शक्य असतानाही का केले जात नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ या एका व्यवस्थेने अनेक पुणेकरांचा त्रास वाचेल असे हे कार्यकर्ते म्हणाले.  रेमडेसिविर,ऑक्सिजन, लसी, या सगळ्याचे कामकाज आता ऑनलाईन होते. त्यासाठी आधार कार्ड वगैरे माहिती द्यावी लागते. या बाबतीतही केंद्राकडून गरजूंंना मदत केली जाते. कोणाचे काम झाले की समाधान त्यांनाही मिळते. अशी त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Ninety out of 100 phones at Corona Patient Support Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.