त्यांना साडीचोळी देऊन सत्कार करीत घरी पाठविण्यात आले.
जगामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले आहे. रोज हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. टाकळी हाजी तालुका शिरूर येथे मात्र एक आशादायक घटना घडली असून, येथील मळगंगा देवी कोविड सेंटरमध्ये नव्वद वर्षांच्या बबूबाई भिवाजी घोडे यांची कोरोनो चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १४ दिवसांपूर्वी कोविड सेंटर मधे ॲडमिट केले होते. त्यांच्यावर येथील डॉक्टर संदेश थोरात, शिरीष गमे, आरोग्यसेविका सुवर्णा थोपटे, अश्विनी कुलकर्णी, पूजा शिंदे, शशिकला पानगे, अर्चना चव्हाण, अर्चना उचाळे यांनी उपचार केले .
आजीने गाणे-भजन म्हणुन रुग्णांच्या सोबत आनंद साजरा केला.
--
फोटो क्रमांक : १५
फोटो : टाकळी हाजी तालुका शिरूर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या 90 वर्षांच्या आजीबाई बबूबाई घोडे यांचा सत्कार करताना घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे व वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका.