शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

नीरादेवघर धरण : प्रकल्पबाधितांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 2:40 AM

निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी दिला आहे.

भोर : निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी दिला आहे.महाराष्ट्र कृणा खोरे विकास संस्थेच्या वतीने निरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वरील इशारा देण्यात आला. यावेळी कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, संजय साने, राजु दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, मारुती कंक, बाळासाहेब पावगे, धोंडीबा मालुसरे, लक्ष्मण दिघे उपस्थित होते.निरादेवघर धरणाच्या कामाला १९८४ साली मान्यता मिळाली होती. १९९३ साली धराणाच्या कामाला सुरवात झाली. २००० साली काम पुर्ण होऊन २००३ साली धरणात पाणी आडविण्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे ११.९२ टीएमसी क्षमतेचे धरण असून धरणात साळव दापकेघर, माझेरी, वेनुपुरी, धामुनशी, वारंवड, हिर्डोशी, प-हर खुर्द, प-हरबुदुक, शिरवली हि.मा, देवघर ११ गावे पुर्णत: बाधित झाली. तर रायरी, दुर्गाडी, अभेपुरी, कुडलीबु, कुडली खुर्द, देवघर, शिरगाव, निगुडघर, कोंढरी ८ गावे अंशत: बाधित असून धरणात सुमारे ४ हजार एकर जमिन पाण्यात गेली आहे. शेतक-यांची धरणात गेलेल्या खातेदारांची संकलन यादी १४५० खातेदारांची असून आत्तापर्यंत मागील १५ वर्षात फक्त ६०० खातेदारांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. ८५० खातेदारांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे. शिवाय ३९ किलोमीटरचा रिंगरोड आणि महाड-पंढरपूर रस्त्यासाठी धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्या आहेत.बाधित गावे : निर्णयाची अंमलबजावणी कराबाधित गावांचे १०० टक्के पुर्नवसन करा, निरादेवघर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनी १०० टक्के पुर्नवसन होईपर्यंत इतरांना वाटप करु नये, १६ मे २००७ रोजीच्या तत्कालीन महसूल व पुनर्वसन मंत्री व रामराजे नाईक निंबाळक र यांच्या उपस्थितीत बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करा.प्रकल्पग्रस्तांना शासन नोकऱ्या देऊ शकत नसल्याने १० लाख रुपये अनुदान द्यावे, प्रकल्पग्रस्त खातेदारांना वहिवाट अडथळे दुर करावेत, व वाटप केलेल्या जमिनीचे ताबे कब्जापटटी करण्यात यावे, लाभ त्रातील जमिनीला पाटाची व्यवस्था करावी, पुनर्वसित गावठाणातील १८ नागरी सुविधा तातडीने पुर्ण कराव्या.फलटण, खंडाळा तालुक्यातील एमआयडीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोक-या द्याव्यात या मागण्यासाठी धरणग्रस्त ३ एप्रिलला तहसिल कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणात असल्याचे कॉम्रेड ज्ञानोबा घोणे व ज्ञानेश्वर दिघे यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रती जिल्हधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, पोलीस यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे